चालक मोबाईलमध्ये दंग : ट्रक रस्त्याखाली उतरला

Foto
सुदैवाने जिवितहाणी टळली

कन्नड, (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील अंजना पळशी धरणाजवळ कन्नड पिशोर रस्त्यावर असलेल्या तीव्र वळणावर एक ट्रक एमएच-२० जीसी २६५९ रस्त्याच्या खाली उतरला.  

यावेळी सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झाली नाही. ही घटना मंगळवारी दि. ३० दुपारी घडली रिमझिम असल्याने पाऊस रस्त्यावर पादचारी अथवा दुचाकी स्वार नसल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, ट्रक चालक हा वाहन चालवताना मोबाईलवर बोलत होता, त्यामुळे त्याच्या लक्षात हे वळण आले नाही, व ट्रक सरळ रस्त्याखाली
उतरला. रस्त्याच्या बाजूलाच एक घर असल्याने ते घरापासून अलीकडेच ट्रक थांबल्याने मोठा अनर्थ टळला.